1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 11 जून 2018 (08:46 IST)

दोघेही सिंगापूरमध्ये दाखल, आज 'ती' ऐतिहासिक भेट

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहे. या भेटीसाठी दोघेही सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान आजच्या किम-ट्रम्प भेटीने कोरियाई युद्धाला औपचारिक पूर्णविराम मिळणार आहे. 
 
गेल्या काही महिन्यांपासून अण्वस्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने चालवली आहे. त्यामुळे किम जोंगला संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. अमेरिकेने उत्तर कोरियाला कारवाईची धमकीही दिली होती. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे प्रमुखांनी भेटून सामंजस्याने चर्चाही केली होती.