12 जूनला सिंगापूरमध्येच किम-ट्रम्प यांची भेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांची 12 रोजी सिंगापूरध्ये भेट निश्चित झाली आहे. व्हाइट हाउसध्ये शुक्रवारी किम जोंग उन यांचे जवळचे जनरल कि योंग-चोल यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर ट्रम्प यांनी स्वतः ट्वीट करून या भेटीची आणि सिंगापूर समिटची अधिकृत माहिती टि्वट केली. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात या भेटीवर तीनवेळा आपले विधान बदलले. आता मात्र ही भेट 12 जूनला सिंगापूर येथेच होणार असे त्यांनी जाहीर केले आहे.
किम यांचे सर्वात जवळचे आणि उत्तर कोरियातील वरिष्ठ लष्करी अधिकारी कि योंग-चोल गुरुवारी अेरिकेत पोहोचले होते. त्यांनी अेरिकेचे परराष्ट्रंत्री माइक पॉम्पियो यांची भेट घेतली. किम आणि ट्रम्प यांची भेट निश्चित करणे हाच त्यांच्या दौर्याचा मुख्य हेतू होता.