सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मे 2018 (09:05 IST)

'ती' ऐतिहासिक भेट रद्द

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करून जोरदार झटका दिलाय. ही बैठक १२ जून रोजी सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आली होती. ट्रम्प यांनी हा निर्णय किम जोंग उन यांच्या वक्तव्यांवर नाराज झाल्यानं घेतलाय. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम यांच्यासोबत होणार असलेल्या बैठकीला दुजोरा दिला होता. सिंगापूर बैठकीबद्दल येत्या आठवड्यात स्पष्ट होईल. आम्ही गेलो तर उत्तर कोरियासाठी ही एक मोठी गोष्ट असेल, असं यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं होतं. 
 
उत्तर कोरियानं पुंगेय-रीमध्ये स्थित अणुचाचणी टेस्ट साईट बंद केलीय. या साईटवर आत्तापर्यंत ६ अणुचाचण्या करण्यात आल्यात. विशेष म्हणजे या बैठकीआधी किम यांनी अणुचाचण्या आणि साईट बंद करण्याचं आश्वासन दिलं होत.