शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , बुधवार, 6 जून 2018 (11:50 IST)

सिंगापूरध्ये डोनाल्ड ट्रम्प-किंम जोंगच्या सुरक्षेची जबाबदारी नेपाळी गुरख्यांवर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यामध्ये होणार्‍या बैठकीआधी सुरक्षा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठीच कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून या परिषदेच्या सुरक्षेची जबाबदारी नेपाळी गुरख्यांवर सोपवण्यात आली आहे. येत्या महिन्याअखेरीस सिंगापूरमध्ये ही बहुचर्चित भेट होणार आहे.
 
नेपाळी गुरख्यांचा जगातील सर्वाधिक घातक सैनिकांमध्ये समावेश होतो. त्यासाठीच या परिषदेच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ट्रम्प आणि किम दोघेही स्वतःची व्यक्तिगत सुरक्षा पथके सोबत घेऊन येणार आहेत. सिंगापूर पोलिसांनी भेटीचे ठिकाण, रस्ता आणि हॉटेलच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या गुरखा पथकावर सोपवली आहे.
 
सिंगापूरमध्ये गुरख्यांचा वावर फारसा जाणवत नाही. मागच्या आठवड्यात शांगरीला हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे संरक्षणंत्री जिम मॅटीस आणि अन्य मंत्री उपस्थित होते. त्यावेळी या परिषदेच्या सुरक्षेची जबाबदारी गुरखा बटालियन सांभाळत होती. खास नेपाळधून सिंगापूर पोलीस दलात या गुरख्यांची भरती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी तैनात असताना त्यांच्याकडे बेल्जियम बनावटीची असॉल्ट रायफल आणि पिस्तुल असते. गुरख्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असली तरी कुकरी हे त्यांचे पारंपरिक शस्त्रही गुरख्याकडे असतेच. कुकरी म्हणजे धारदार चाकू. कुकरीशिवाय गुरखे युद्धाची तयारी करत नाहीत.