गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जून 2018 (08:50 IST)

पेटीएमकडून ग्राहकांना विविध ऑफर्स

पेटीएम अॅप्लिकेशनकडूनही ग्राहकांना विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. या माध्यमातून तुम्ही नामवंत कंपन्यांचे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत खरेदी करु शकणार आहात. पाहूयात कोणत्या मोबाईलवर कोणती ऑफर देण्यात आली आहे.
 
ओप्पो
ओप्पो ए५७ फोनच्या ३२ जीबी व्हेरिएंटवर २५ टक्के डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन ११,९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. यासोबतच १,१९९ रुपयांची कॅशबॅक ऑफरही उपलब्ध आहे. कॅशबॅकनंतर या फोनची किंमत कमी होऊन १०.९७१ रुपये होणार आहे.
 
नोकिया
नोकियाचा स्मार्टफोन पेटीएम मॉलवर २१ टक्के डिस्काऊंटसह खरेदी करता येणार आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना १८ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. गेल्यावर्षी लाँच झालेला नोकियाचा प्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ८ पेटीएम मॉलवर २१ टक्क्यांच्या सूटसह ३१,५०० रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच ५,६७० रुपयांचा कॅशबॅकही मिळत आहे. सर्व ऑफर्सनंतर फोनची किंमत २५,८३० रुपये होणार आहे.
 
Vivo
ओप्पो प्रमाणेच Vivo च्या फोनवरही ५ टक्क्यांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. चीनी कंपनीच्या Vivo V5S स्मार्टफोनवर ३१ टक्के सूट मिळत आहे. तसेच ६५५ रुपयांचा कॅशबॅकही आहे. अशा प्रकारे हा फोन १२,४४४ रुपयांत खरेदी करता येणार आहे.
 
मोटोरोला
मोटोरोलाच्या फोनवर तब्बल ३५ टक्क्यांची सूट मिळत असून मोटो जी5एसचा ३२ जीबी व्हेरिएंटवर १७५८ रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन ८,७०० रुपयांत खरेदी करता येईल. मोटो एक्स4 चा ६४ जीबी व्हेरिएंटवर अधिकाधिक कॅशबॅक ४,२६४ रुपये आहे. त्यामुळे हा हँडसेट १९,४२६ रुपयांत उपलब्ध आहे.
 
याबरोबरच सॅमसंग, लिनोवो, अॅप, ऑनर अशा कंपन्यांचे फोनही पेटीएम मॉलवरुन अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. या मोबाईलवरही ६ ते ९ हजार रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे.