मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (12:22 IST)

नवीन सेफ्टी फीचर्ससह मारुतीने 2019 इग्निसला बाजारात आणले

maruti launches
मारुती सुझुकीने त्याधुनिक सुरक्षा फीचर्ससह सुसज्ज हॅचबॅक कार 2019 मारुती इग्निस (2019 Maruti Suzuki Ignis) बुधवारी लॉन्च केली. त्याची किंमत 4.79 लाख आणि 7.14 लाख (एक्स-शोरूम) मध्ये ठेवली गेली आहे. 
 
नवीन इग्निस ड्राइव्हरच्या जवळच्या सीटमध्ये सीट बेल्ट रिमाइंडर आणि हाय स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सिस्टमसह इतर फीचर्ससह सुसज्ज आहे. नवीन सुरक्षा नियमांतर्गत, यावर्षी एक जुलैपासून तयार होणाऱ्या सर्व प्रवासी वाहनांसाठी ही सुविधा अनिवार्य असेल. 
 
मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) चे वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि सेल्स) आरएस कलसी म्हणाले की प्रवासी सुरक्षेच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलताना इग्निसमध्ये अधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहे. ते म्हणाले की इग्निसच्या जेट्स आणि अल्फा ऍडिशनमध्ये आता नवीन रूफ रेल्सच दिली जात आहे.