मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (16:06 IST)

Moto G7 Power भारतात लॉन्च

मोटोरोला इंडियाने भारतात आपला नवीन स्मार्टफोन मोटो जी7 पावर लॉन्च केला आहे. Moto G7 Power चा ब्लॅक कलर व्हेरिएंट ऑफलाइन व्यतिरिक्त, फ्लिपकार्टवर विकला जात आहे. त्याची किंमत 13,999 रुपये आहे. Motorola ने दावा केला आहे की Moto G7 Power 60 तास बॅटरी लाइफ देईल. 
 
* Moto G7 Power किंमत आणि फिचर्स  :-
 
Moto G7 मध्ये 6.2 इंच एलसीडी एचडी प्लस नॉच डिस्प्ले आहे, ज्याचे आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. 
फोनमध्ये क्वालकॉमचा ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर आहे, ज्याची क्लॉक स्पीड 1.8GHz आहे. 
या व्यतिरिक्त फोनमध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने 512 जीबीपर्यंत वाढवता येते. 
यात 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. 
दोन्ही कॅमेरे सह एलईडी फ्लॅश लाइट मिळेल. 
कॅमेर्‍यासह आपण 4के व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. 
फोनमध्ये स्टॉक अँड्रॉईड उपलब्ध होईल जो अँड्रॉइड पाई 9.0 वर काम करेल. 
या फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी आहे जे फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.