सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (12:44 IST)

Pulwama Terror Attack: शहिदांच्या सन्मानार्थ विराट कोहलीचा मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय रिझर्व पोलिस दल (सीआरपीएफ) वर झालेल्या हल्ल्यामुळे भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार विराट कोहली देखील स्तब्ध आहे. संपूर्ण देश या प्रसंगामुळे शोकांत आहे. अशामध्ये कोहलीने मोठा निर्णय घेतला असून त्यांच्या फाउंडेशनतर्फे दिले जाणारे इंडियन स्पोर्ट्स ऑनर पुरस्कार रद्द केले आहे. आता हे पुरस्कार नंतर देण्यात येतील. हे पुरस्कार शनिवारी (16 फेब्रुवारी) दिले जाणार होते. भारतीय क्रीडा सन्मान आरपी-संजीव गोयनका ग्रुप आणि विराट कोहली फाउंडेशनचे संयुक्त प्रयत्न आहे. 
 
कोहलीने हा निर्णय सीआरपीएफ जवानांच्या शहिदांचे सन्मान करताना घेतला आहे. त्याने ही माहिती ट्विटरवर दिली. त्याने आरपी-एसजी स्पोर्ट्स ऑनर्स इव्हेंट रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याने ट्विटरवर लिहिले - दुःखाच्या या क्षणी आम्ही हा कार्यक्रम रद्द केला आहे.  
 
पुढे तो म्हणाला, "या कार्यक्रमात मनोरंजन आणि खेळ जगातील मोठे सेलिब्रिटीज सामील होणार होते. समारंभाशी संबंधित प्रत्येक भागीदार, सर्व खेळाडू आणि प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे. जेव्हा भारत आपल्या सैनिकांच्या शहिदांचे शोक करीत आहे, अशा वेळी आम्हाला प्रोग्राम होस्ट करण्याची परवानगी नाही." यापूर्वी विराटने या हल्ल्याची निंदा करताना लिहिले, सुरक्षा कर्मचा-यांवर या अत्यंत घृणास्पद हल्ल्यामुळे ते स्तब्ध आहे. या हल्ल्याच्या बातम्या ऐकल्यावर मला अत्यंत वाईट वाटले. मी जखमी सैनिकांची त्वरित निरोगी होण्याची प्रार्थना करतो. 
 
वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, व्हीव्हीएस लक्ष्मण, शिखर धवन, सुरेश रैना, मोहम्मद कैफ आणि अन्य इतर क्रीडा हस्तियांनी देखील ट्विटरवर या हल्ल्याची निंदा केली आहे आणि शहिदांच्या कुटुंबीयांबद्दल त्यांची भावना व्यक्त केली आहे.