मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'हे' आहेत भारतातील महागडे सेलिब्रिटी

साल  २०१८ या वर्षातील सर्वांत महागडा भारतीय सेलिब्रिटी विराट कोहली आणि दीपिका पदुकोण ठरले आहेत. ‘डफ अँड फेल्प्स’द्वारा जाहीर करण्यात आलेल्या भारतातील सर्वांत महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट सलग दुसऱ्यांदा अग्रस्थानी आहे. विराटचे ब्रँड मूल्य १७०.९ मिलिनय डॉलर तर दीपिकाचे ब्रँड मूल्य १०२.५ मिलिनय डॉलर इतके आहे. विशेष म्हणजे विराटशिवाय १०० मिलियन डॉलर ब्रँड मूल्याचा आकडा पार करणारी एकमेव सेलिब्रिटी दीपिका ठरली आहे.
 
गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत विराटने भारतातील २४ विविध ब्रँड्सच्या जाहिराती केल्या तर दीपिकाने २१ विविध ब्रँड्सच्या जाहिराती केल्या. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर दीपिकाचा पती रणवीर सिंग चौथ्या स्थानी आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, वरुण धवन आणि हृतिक रोशन यांचा टॉप १०मध्ये समावेश आहे.