मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 1 सप्टेंबर 2018 (09:36 IST)

विराटने कसोटीमध्ये सहा हजार धावा पूर्ण, तेंडुलकरचा एक विक्रम मोडला

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचलाय. इंग्लंड येथील कसोटी सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे. सामना सुरु होण्याआधी विराटला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती. विराट कोहलीला कसोटीमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केलाय. कोहलीने आतापर्यंत ११९ डावांत ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला. सचिनने १२० डावांत सहा हजार धावा केल्या होत्या. त्यामुळे धावा काढण्याच्या बाबतीत विराट सचिनच्या सरस ठरलाय. आज विराट कोहलीने चौथ्या कसोटीत सहा धावा काढत सचिनचा विक्रम मोडला.  
 
सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने सहा डावांत ४४० धावा केल्या आहेत. या मालिकेत विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. आतापर्यंत विराट कोहलीने ६९ कसोटी सामन्यातील ११८ डावांत फलंदाजी करताना २३ शतकांसह ५९९४ धावा केल्या आहेत.