शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

6 जीबी रॅम असलेल्या सॅमसंग गॅलॅक्सी ए8 स्टार ची पहिली सेल आज

सॅमसंगने मागील आठवड्यात भारतात आपले नवीन स्मार्टफोन गॅलॅक्सी ए8 स्टार लाँच केले होते आणि आज म्हणजे 27 ऑगस्ट 2018 ला या फोनची पहिली सेल आहे. हा फोन आजपासून अमेझॉन इंडियाहून खरेदी केला जाऊ शकतो. तसेच 5 सप्टेंबरपासून रिटेल स्टोअरहून याची विक्री सुरू होईल. 
 
आधी हा फोन चीनमध्ये गॅलॅक्सी ए9 स्टार नावाने लाँच करण्यात आला होता. सॅमसंग गॅलॅक्सी ए8 स्टार चे वैशिष्ट्ये म्हणजे यात ड्यूएल रिअर कॅमेरा आणि 6.3 इंचाची फुल एचडी सुपर एमोलेड इन्फिनिटी डिस्प्ले आहे.
 
सॅमसंग गॅलॅक्सी ए8 स्टार स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 6.3 इंचाची फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले असून याचे रिझोल्यूशन 1080x2160 पिक्सल आहे आणि आस्पेक्ट रेशियो 18.5:9 आहे. डिस्प्ले वर 2.5D आणि 3D ग्लास प्रोटेक्शन आहे. सोबतच मेटल फ्रेम बॉडी आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमचे स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर, एंड्रॉयड ओरियो 8.1, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येईल.
 
सॅमसंग गॅलॅक्सी ए8 स्टार कॅमेरा
फोनमध्ये ड्यूएल रिअर कॅमेरा आहे. याचा एक लेंस 16 मेगापिक्सल आणि दुसरा 24 मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सल असून फ्रंट कॅमेरा अपर्चर f/2.0 आहे. फ्रंट कॅमेर्‍यासह स्मार्ट ब्युटी, प्रो लाइटिंग आणि AR स्टिकर्स सपोर्ट मिळेल. फ्रंट कॅमेर्‍यासह फेस अनलॉक पर्याय देखील आहे.
 
कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचं तर यात 3700 एमएएच बॅटरी असून ड्यूएल सिम, 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5, जीपीएस, फिंगरप्रिंट सेंसर, यूएसबी टाइप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळेल.
 
किंमत आणि उपलब्धता
गॅलॅक्सी ए8 स्टारची किंमत 34,990 रुपये असून हा फोन मिडनाइट ब्लॅक आणि इव्होरी व्हाईट कलर वेरियंट मध्ये मिळेल. HDFC क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल.