गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (09:14 IST)

सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीमध्येही घट

सोन्याच्या किंमती ९० रुपयांनी घटल्या आहेत. सोन्याची किंमत ३०,२५० रुपये प्रती तोळा एवढी झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीमध्येही घट पाहायला मिळाली. चांदीची किंमत ३८ हजार रुपयांपेक्षाही कमी झाली आहे. बुधवारी स्वातंत्र्य दिन आणि शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयींच्या निधनामुळे बाजार बंद होता. याचाही परीणाम सोनं-चांदीच्या किंमती कमी होण्यावर झाल्याचं बोललं जातंय.
 
आठवडाभरामध्ये चांदीचे दरही १ हजार रुपयांनी उतरले आहेत. तर चांदीच्या शिक्क्यांची किंमत २ हजार रुपयांनी घसरले आहेत. चांदीचे भाव ३८ हजार रुपये किलो एवढे झाले आहेत.  
 
दिल्लीमध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचे दर ३०,२५० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे दर ३०,१०० रुपये प्रती तोळा आहेत. आठवडा भरामध्ये सोन्याचे दर ४५० रुपयांनी घसरले आहेत.