सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 30 जुलै 2018 (09:15 IST)

भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फिनलंडमधील सावो गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. कौशल्यपूर्ण खेळीने त्याने चीन तैपेईच्या चाओ सुन चेंगचा पराभव केला. ८५.६९ मीटर अंतरावर भालाफेक करुन त्याने हे सुवर्णपदक जिंकले. नीरजने यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तर या स्पर्धेत चेंगला ८२.५२ मीटरपर्यंत भालाफेक करीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 
नीरजने यापूर्वी मे महिन्यांत दोहा येथे झालेल्या डायमंड लीग मिटिंगमध्ये ८७.४३ मीटर भालाफेकत वैयक्तिक सर्वोत्कृष्ट आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. त्यानंतर आजच्या स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी नोंदवली. या सुवर्णपदकामुळे त्याने आशियातील विक्रमवीर चेंगला मागे टाकत पहिल्याक्रमांकावर विराजमान होण्याचा मान पटकावला आहे.