शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By

FIFA WC 2018: शेवटल्यावेळी मैदानात उतरतील हे दिग्गज खेळाडू

फिफा विश्वचषक 2018 मध्ये काही खेळाडू असे असतील ज्यांच्याकडे खेळ दाखवण्याची ही शेवटली वेळ ठरणार. जाणून घ्या कोण आहे ते खेळाडू, जी पुढील विश्वचषकात दिसणार नाहीत:
 
आंद्रे इनिएस्ता- स्पेनच्या महान मिडफिल्डरमध्ये समाविष्ट आंद्रे इनिएस्ता हे नाव 9 वेळा विश्व एकादश आणि 6 वेळा यूएफा टीम ऑफ द इयर यात नोंदलेले आहे. इनिएस्ता ला शेवटल्या क्षणांमध्ये खेळ पालटणारा खेळाडू मानलं गेलं आहे. 2018 विश्वचषक त्याच्या करिअरचा शेवटलं विश्वचषक असणार.
 
टिम केहिल- ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फुटबॉलर्स मध्ये सामील टिम केहिल आपल्या हेडरमुळे प्रसिद्ध आहे. 2006, 2010, 2014 साली झालेल्या विश्वचषकात त्याने आपल्या खेळामुळे सगळ्यांना प्रभावित केले होते. हा पहिला ऑस्ट्रेलियन फुटबॉलर आहे ज्याच्या नावावर विश्व चषकात 5 गोल नोंदलेले आहेत. टिम केहिल 2018 विश्वचषकात शेवटल्या वेळी राष्ट्रीय टीमची जर्सी घालतील.
 
राफेल मार्केझ- अॅटलस फुटबॉल क्लबने आपल्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात करणार्‍या मेक्सिकोचा मिडफिल्डर राफेल मार्केझ याने एप्रिलमध्ये क्लब फुटबॉलला गुडबाय म्हटले होते. 2018 विश्वचषकात राफेलचा खेळ बघणार्‍यासाठी ही शेवटची संधी असेल. हे आपल्या देशाचे पहिले असे खेळाडू आहे ज्याने सतत 4 विश्वचषकांसाठी आपल्या टीमसाठी कर्णधारपदाची जबाबदारी पेलली आहे.
(फोटो साभार- ट्विटर)