शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: सोमवार, 16 जुलै 2018 (16:47 IST)

हॅरी केननेला मिळाला 'गोल्डन बूट'

फ्रान्सने क्रोएशियाला पराभूत करत पुन्हा एकदा इतिहास रचला. दुसरीकडे इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर राहिला असला तरी कर्णधार हॅरी केनने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक 6 गोल करत गोल्डन बूट मिळवला आहे. फुटबॉल वर्ल्डकप सुरु होण्याआधी इंग्लंड या सीजनमधला प्रबळ दावेदार मानला जात होता. केनने चांगली कामगिरी करत टीमला सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं. त्याने 6 सामने खेळले आणि 6 गोल केले. केन फुटबॉल वर्ल्डकपचा गोल्डन बूट मिळवणारा दुसरा इंग्लंडचा खेळाडू आहे. याआधी 1986 मध्ये मॅक्सिकोमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये गॅरी लिनाकरने गोल्डन बूट जिंकला होता. लिनाकरने ही 6 गोल केले होते.
 
पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो, बेल्जियमचा रोमेलु लुकाकु, फ्रान्सचा अँटोनी ग्रीजमॅन, फ्रान्सचा एम्बाप्पे आणि रशियाचा डेनिस चेरीशेवने या सीजनमध्ये 4 गोल केले आहेत. लियोनेल मेसीने 1 तर ब्राझीलच्या नेमारने 2 गोल केले.