शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (15:38 IST)

‘गोल्ड’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

Gold
अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ या इतिहासातील एका सुवर्णकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘गोल्ड’ने पहिल्या दिवशी २५.२५ कोटी रुपयांची कमाई केली. या कमाईमुळे अक्षय आणि त्याच्या या चित्रपटाने एक नवीन उंची गाठली आहे.
 
पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर इतकी कमाई करणारा अक्षय कुमारच्या करिअरमधला हा पहिलाच चित्रपट आहे. विशेष म्हणजे या वर्षात सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘गोल्ड’ हा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टायगर श्रॉफच्या ‘बागी २’ला ‘गोल्ड’ने मागे टाकलं आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटाची कथा भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक्समध्ये मिळवलेल्या पहिल्या सोनेरी यशाची आहे. रीमा कागती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसह मौनी रॉय, अमित साध, कुणाल कपूर, विनीत सिंग, सन्नी कौशल हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.