सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जुलै 2018 (15:30 IST)

'अक्षय कुमार', जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रीटींची यादीत

‘फोर्ब्स’नं नुकतीच world’s 100 highest paid entertainers अर्थात जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रीटींची यादी जाहीर केली. जगभरातील मनोरंजन, संगीत, खेळ यांसारख्या विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या १०० सेलिब्रिटीची नावं या यादीत आहेत. यात भारतातील दोन अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शाहरुख आणि आमिरला मागे टाकत अक्षय कुमारनं या यादीत स्थान पटकावलं आहे. जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलीब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार ७६ व्या स्थानी आहे.
 
अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांमध्ये अक्षयनं काम केलं. चित्रपटाच्या माध्यामातून त्यानं हे प्रश्न पुढे नेले आहेत असं कौतुक फोर्ब्सनं केलं आहे. अक्षयचं एकूण उत्पन्न ४०.५ मिलिअन डॉलर म्हणजे एकूण अडीच अब्जाहून अधिक असल्याचं फोर्ब्सनं म्हटलं आहे. अक्षयनंतर या यादीत ८२ व्या क्रमांकावर  सलमान खानच्या नावाचा समावेश आहे. सलमानची एकूण कमाई ही ३७.७ मिलिअन डॉलर म्हणजे २ अब्जाहून अधिक असल्याचं म्हटलं जातं आहे.