1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 10 जुलै 2018 (16:04 IST)

‘चुंबक‘ चित्रपटाबद्दल ‘स्वानंद किरकिरे‘ यांच्याशी विशेष बातचीत

Swanand Kirkire
-रुपाली बर्वे
गीतकार, गायक, संगीतकार, लेखक आणि अभिनेता अशा विविध भूमिकांना योग्य न्याय देणारे व दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे स्वानंद किरकिरे चुंबक या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. वेबदुनिया मराठीशी विशेष संवाद साधत स्वानंद किरकिरे म्हणाले की प्रेक्षकांचं मन जिंकण्यात हा सिनेमा खरा उतरेल.
 
ही ऑफर स्वीकार करण्यामागील कारण विचारल्यावर किरकिरे म्हणाले की जेव्हा दिग्दर्शक संदीप मोदी आणि निर्माते नरेन कुमार भेटायला आले तर वाटलं चित्रपटासाठी म्युझिकसंबंधी काही चर्चा होईल पण जेव्हा त्यांनी लीड रोल ऑफर केला तर भूमिकेबद्दल जाणून मी त्वरित हो म्हटलं कारण या भूमिकेसाठी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि अशी सशक्त भूमिका नाकारण्यासारखे काहीच नव्हते.
 
कथेबद्दल सांगताना किरकिरे म्हणाले की ते एका 45 वर्षाच्या प्रसन्ना ठोंबरे ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आणि ही कहाणी आहे की कशा प्रकारे 15 वर्षाचा मुलगा बाळू (साहिल जाधव) आणि त्याचा मित्र (संग्राम देसाई) भोळ्याभाबड्या प्रसन्नाला गुंडाळतात. नंतरचे घटनाक्रम आयुष्यात काय योग्य आणि त्याची निवड कशी करायची याबद्दल भाष्य करतात. आणि याच गोष्टीने अक्षयचे मन जिंकले.
 
त्यांनी म्हटले बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत करत असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे यावरून आपण विचार करू शकता की यात नक्कीच काही विशेष असेल. अक्षयला सिनेमा एवढा आवडला की त्यांनी सिनेमाला आणि कलाकारांना भरभरून प्रतिसाद दिला. अक्षयने चित्रपट पाहिल्यानंतर याची प्रस्तुती करण्याची निवड केली. 
 
यापूर्वी स्वानंद किरकिरे अनेक हिंदी व मराठी सिनेमात सशक्त भूमिका निभावून चुकले आहेत. तरी लीड रोल म्हणून पहिला चित्रपट म्हणून काही टेन्शन आलंय का? विचारल्यावर ते म्हणाले, सिनेमा उत्तम बनलाय, सर्वांनी उत्कृष्ट अभिनय केले आहे, विषय चांगला आहे त्यामुळे ताण तर नाही तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची उत्सुकता मात्र नक्की आहे.
 
हिंदी की मराठी चित्रपट करायला अधिक आवडतं यावर कि‍रकिरे म्हणाले की भाषा कुठलीही असली तरी भूमिका अधिक महत्त्वाची असते. मला दोन्ही भाषेत सिनेमे करायला आवडतं हो पण मराठी आपली भाषेप्रती आपुलकी तर असणारच. 
 
अक्षय कुमारने चित्रपटाचे पहिलं गाणं लाँच केलं आहे.
‘चुंबक’ २७ जुलै २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.