शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जुलै 2018 (12:12 IST)

ठरलं,‘2.0’चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार

रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे चर्चेत होता. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात आहे. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुहूर्त सापडला असून २९ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘2.0’हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस शंकर यांनी ‘2.0’नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली. २०१७ मध्येच या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं होतं. मात्र वीएफएक्स आणि इतर तांत्रिक बाबींमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं. ४५० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयचा हा पहिलाच तामिळ चित्रपट असून या चित्रपटात अक्षय खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘एंथरिन’चित्रपटाचा सिक्वल आहे.