बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

रजनीकांतला चाहत्यांचा मोठा पाठिंबा

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेशाची घोषणा केली आहे. त्यानंतर जगभरातील आपल्या चाहत्यांना एकवटण्यासाठी त्यांनी एक वेबसाईटही तयार केली. ‘रजनीमंद्रम डॉट ओआरजी’ या वेबसाईटवर नोंदणी करून कुणीही रजनीकांत यांना पाठिंबा दर्शवू शकतो. रजनी यांनी या वेबसाईटची आणि अ‍ॅपची घोषणा करताच अवघ्या काही तासांमध्येच तीन लाख लोकांनी या वेबसाईटवर नोंदणी केली.  त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या त्यांच्या चाहत्यांची झुंबड उडाली आहे.

या व्यतिरिक्‍त सुमारे 50,000 अनधिकृत रजनीकांत फॅन क्‍लब आहेत. ज्यांच्यावरही रजनी यांचे चाहते  सक्रिय झाले आहेत. अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये रजनीकांत यांच्या पार्टीचे अधिकृत अ‍ॅप्लिकेशन आहे. या अ‍ॅपवरूनही त्यांचे समर्थक त्यांना पाठिंबा दर्शवू शकतात.