सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हे आहे पद्मावतीचे जोहर स्थळ, अजूनही येते किंचाळ

चित्तोड येथील गौरवशाली इतिहास न केवळ रजपुतांच्या बहादुरीचा साक्षी आहे बलकी मेवाडच्या या भूमीवर अश्या वीरांगना पैदा झाल्या होत्या ज्यांनी धर्म आणि मर्यादेचे रक्षण करण्यासाठी अग्नीत स्वत:ला स्वाहा केले. येथेच ते स्थळ आहे जिथे लोकं श्रद्धेने डोके टेकतात. या कुंडात राणी पद्मावती अर्थातच पद्मिनी यांनी 16 हजार स्त्रियांसह जोहर केले होते.
 
चित्तोडगड किल्ल्यात त्या कुंड्याकडे वळणारा रस्ता आजही त्या भयावह कहाणीचा साक्षीदार आहे. हा रस्ता अंधारातून असून लोकं अजूनही तेथे जाण्याची हिंमत करत नाही. या अरुंद वाटेच्या भिंती आणि काही गज दूर भवनांमध्ये आजही कुंडातील अग्नीचे चिन्ह आणि उष्णता अनुभव केली जाऊ शकते.
 
अग्निकुंडातील उष्णतेमुळे भीतींवरील प्लास्टर जळाले स्पष्ट दिसून येतात. या चित्रात कुंडाजवळ दिसत असलेल्या दारातूनच राणी पद्मावतीने आपल्या साथी स्त्रियांना घेऊन कुंडात उडी मारली होती असे समजते. जोहर इतकं विशाल होतं की अनेक दिवसापर्यंत कुंडातील अग्नी शांत झाली नव्हती.
 
शेकडो वीरांगनांची आत्मा आजही या कुंडात असून यातून स्त्रियांच्या किंचाळण्या आवाज येत असतो असे स्थानीय लोकांचा विश्वास आहे.