सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (11:22 IST)

ज्येष्ठ नागरिकांना बॅंकांकडून घरीच सर्व सेवा दिल्या जाणार

सत्तर आणि त्यापेक्षा वय असलेल्या नागरिकांना त्यांच्या बॅंकेंच्या कामासाठी आता बॅंकेत जाण्याची गरज पडणार नाही. त्यांना घरीच सर्व सेवा दिल्या जाणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं काढलेल्या एका परिपत्रकातून सर्व बँकांना ही सूचना करण्यात आली आहे.

सत्तर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकिंगच्या मूलभूत सुविधा घरच्या घरीच उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांसाठी काढलेल्या एका परिपत्रकात, ज्येष्ठ नागरिकांना खात्यात पैसे भरणे, पैसे काढणे, डिमांड ड्राफ्ट काढणे, नवीन चेकबुकची मागणी आणि चेकबुक घरी मिळणे अशा सुविधा त्यांच्या घरीच उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ ची मुदतही देण्यात आली आहे.