हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरु झाले आहे. राज्यातील सर्वच ६८ मतदार संघासाठी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात ६२ आमदारांसह ३३७ उमेदवाराचं भविष्य मतदार पेटीत बंद करणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सत्ताधारी कॉंग्रेस आणि माजी मुख्यमंत्री धुमल यांच्या नेतॄत्वात भाजप सर्वच ६८ जागांवर लढत आहे. तर बसपा ४२, माकपा १४, स्वाभिमान पार्टी आणि लोक गटबंधन पक्ष सहा-सहा जागांवर लढत आहेत. आणि भाकपा तीन जागांवर लढत आहे.