1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Andhra Pradesh Krishna river boat tragedy

कृष्णा नदीमध्ये बोट उलटल्याने १६ ठार

आंध्र प्रदेश कृष्णा नदी
आंध्र प्रदेशात कृष्णा नदीमध्ये बोट उलटल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. विजयवाडातील इब्राहिमपट्टणम मंडल भागात ही घटना घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या लोकांच्या डोळ्यादेखत ही बोट बुडाली. 
 
भवानी बंदरापासून विजयवाडा जवळच्या पवित्र संगम या ठिकाणी बोट चालली होती. त्याचवेळी विजयवाडाजवळ ही बोट अचानक उलटली. या बोटीत ‘ओंगोले वॉकर्स क्लब’चे सदस्य होते.  बोटीत बसलेल्या एकाही प्रवाशाने लाईफ जॅकेट घातले नव्हते. सुरक्षेबाबतचे निकष पाळले गेले नाहीत. 
 
पुढील लेख
गांगुलीच्या मताप्रमाणे टी-20च्या प्रति धोनीने दृष्टिकोन बदलावा