रविवार, 11 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एअर एशियाकडून बंपर डिस्काऊंट

एअर एशियाकडून बंपर डिस्काऊंट
मलेशियाची एअरलाईन्स एअर एशियानं या बंपर डिस्काऊंटची घोषणा केली आहे. यात देशांतर्गत विमान प्रवासासाठी 99 रुपयांचं बेस फेअर, तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी फक्त 444 रुपयांचं बेस फेअर आहे. 
 
मे 2018 ते जानेवारी 2019 पर्यंतच्या प्रवासासाठी ही योजना लागू असेल. मात्र या ऑफरसाठी ठरावीक कालावधीतच बुकिंग करावी लागणार आहे. भारतात एअर एशिया आणि टाटा सन्सची 51 टक्के आणि 49 टक्के अशी भागीदारी आहे. कंपनीनं दिलेल्या जाहीरातीनुसार या विशेष ऑफरसाठी 19 नोव्हेंबरपर्यंत बुकिंग करता येणार आहे.