शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (16:42 IST)

दिल्ली प्रदूषण : अखेर वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू

आपली राजधानी दिल्ली प्रदुशानाने ग्रासली आहे. दिल्लीच्या प्रदूषणाची मोठी वाढ झाली असून त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे अखेर  वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू करण्यात येणार  आहे. ही योजना  सोमवारपासून लागू  करण्यात येणार आहे. ही योजना पुढील ५ दिवस कायम राहणार आहे. यामध्ये  कार, बस, दुचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना बंधनकारक असणार आहे. मात्र  रुग्णवाहिकांसारख्या तातडीच्या सेवा वगळता कुणालाही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाणार.  राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणानं काही अटींसह केजरीवाल सरकारला याची परवानगी दिली. या प्रकरणात दिल्लीत गाडीचा शेवटचा नंबर २, ४,  ६ अशा सम संख्येचा असेल,अशीच वाहनं ठराविक दिवशी  विषम संख्येचा नंबर असणाऱ्या गाड्यांनाही असाच नियम लागू होणार आहे. यामुळे गाड्यांची संख्या कमी होऊन प्रदूषणाला आळा बसेल, असा विचार केजरीवाल सरकारचा आहे. मात्र या योजनेमुळे किती प्रदूषण कमी होणार हे पहावे लागणार आहे.