मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (10:44 IST)

शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार

आता शिवसेनेनं गुजरातच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी आणखी वाढू शकते. 40 हून अधिक जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे हिंदुत्वावादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भाजपला भोगावा लागू शकतो.

यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. असं म्हटलं होतं. पण आता अचानकपणे शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे.