1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सुप्रिया ताईंचा सेफी विथ खड्डे

supriya sule

खासदार सुप्रिया सुळे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारवर निशाणा साधलाय. सुळे यांनी बापदेव घाटातील रस्त्याची दुरवस्था दाखून देण्यासाठी चक्क खड्यांसोबतचा सेल्फी ट्विटरवरुन शेअर केलाय. सोबतच आपले  माननीय मंत्रिमहोदय चंद्रकांत पाटील खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा असे, आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊयात. खड्डे असलेले रस्ते त्यांना दाखवून देऊया, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.