1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (10:38 IST)

नेहरूही देशाला संघमुक्त करण्याची इच्छा नेहरुजींची पण होती – पंतप्रधान

narendra dabholkar
देशाला कॉंग्रेसमुक्त करण्याच्या भाजपच्या घोषणेबद्दल त्या पक्षाला विरोधकांकडून लक्ष्य केले जाते. या टीकेचा समाचार मोदींनी घेतला. भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू हेसुद्धा सुरूवातीच्या काळात देशाला जनसंघ (पूर्वाश्रमीचा भाजप) मुक्त करू असे म्हणायचे. आताचा कॉंग्रेस पक्ष महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यसैनिकांचा नाही. आताचा कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या राजकारणात गुरफटलेला आहे. संपूर्ण देशातील जनता स्वच्छता अभियानात सहभागी झाली आहे. संधी मिळेल तेव्हा जनता निवडणुकीच्या माध्यमातून जुन्या पक्षाची (कॉंग्रेस) स्वच्छता करत आहे, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला.