मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (14:04 IST)

काम करण्यासाठी मुंबई बेस्टच

मुंबई आणि दिल्ली या दोन प्रमुख महानगरांपैकी सुट्ट्या आणि इतर सुविधांचा विचार केल्यास मुंबई काम करण्यासाठी उत्तम असल्याचे जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. मात्र पगाराचा विचार केल्यास दिल्ली आर्थिक राजधानी मुंबईच्या पुढे आहे. दिल्लीत कर्मचाऱ्यांना मिळणारा सरासरी पगार मुंबईच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक आहे.

मंगळवारी जागतिक बँकेने व्यवसाय सुलभतेबद्दलचा अहवाल जाहीर केला. यानंतर आता जगभरातील प्रमुख शहरांमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सरासरी पगाराची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. यामधून दिल्लीतील सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका कॅशियरला दर महिन्याला कमीत कमी २१७.६ अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारणत: १४ हजार रुपये इतका पगार मिळतो. तर मुंबईत एका कॅशियरला सरासरी १३४ डॉलर म्हणजेच ८ हजार ६५० रुपये पगार मिळतो. याचा अर्थ दिल्लीतील कर्मचाऱ्यांचा पगार मुंबईतील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांनी जास्त आहे.