1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2017 (10:36 IST)

पहिल्यांदाच सुपरस्टार रजनीकांत मराठीत

Rajinikanth to act in Marathi Movie Veer Bajiprabhu
मूळचे मराठमोळे असलेले शिवाजीराव गायकवाड म्हणजे दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार रजनीकांत आता आपली जादू मराठी सिनेमांमध्ये दाखवणार आहेत. दिग्दर्शक दिपक भावे यांच्या आगामी चित्रपटात रजनीकांत आणि दाक्षिणात्य अभिनेता मामुटी दिसणार आहेत.

"पसायदान" असं या सिनेमाचं नाव असून या दोघांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. बाळकृष्ण सुर्वे या सिनमाची निर्मिती करत आहेत. तर दिपक भावे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असल्याचे निर्माते बाळकृष्ण सुर्वेंनी सांगितले आहे.