बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (16:39 IST)

सर्व मराठी सिनेमांनी 'इफ्फी' महोत्सवावर बहिष्काराची तयारी

'न्यूड' केवळ नावावरूनच ‘इफ्फी’तून वगळण्यात आल्याच्या विरोधात मराठी सिनेनिर्माते आता एकवटले आहेत. निर्मात्यांनी दिग्दर्शक रवी जाधव यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी सर्व मराठी सिनेमांनी या महोत्सवावर बहिष्कार टाकण्याची तयारी केली आहे.

२० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) पॅनोरमा विभागातून निवड झालेल्या मराठी सिनेमांची संख्या लक्षणीय आहे. महोत्सवात ‘एस दुर्गा’ या मल्याळम आणि ‘न्यूड’ या मराठी सिनेमाला कोणतीही पूर्वसूचना न देता वगळण्यात आले. या निर्णयाविरोधात मराठी सिनेसृष्टी एकवटली असून जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी या महोत्सवातून सर्वच मराठी सिनेमे माघार घेण्याच्या विचारात आहेत. ‘इफ्फी’मध्ये एकूण नऊ मराठी सिनेमे दाखवले जाणार आहेत.