गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

दशक्रिया चित्रपटाला जोरदार विरोध

एका बाजूला पद्मावती चित्रपट वादाच्या भोवऱ्यात असतांना मराठी चित्रपट सुद्धा जोरदार विरोध होत आहे. यामध्ये दशक्रिया हा चित्रपटगृहात तर आला मात्र त्याला जोरदार विरोध होत असून नाशिक, औरंगाबाद आणि पुणे येथे या विरोधात जोरदार घोषणाबाजी करणायत आली आहे. तर औरंगाबाद येथे आज  सिनेमाच्या प्रदर्शनावरुन पुरोहित आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

पुरोहितांनी बंद पाडलेल्या ‘दशक्रिया’ सिनेमाच्या शोला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आज तेथे पुरोहितांनी प्रोझोन मॉलमधील सिनेमागृहात घुसून निदर्शनं केली आहे. तर घोषणा देत  सिनेमाचा शो बंद पाडला.

चित्रपटात ब्राह्मण समाजाची बदनामी आरोप करत सिनेमा प्रदर्शित करु नये अशी मागणी त्यांनी केली. तर नाशिक येथे एका मॉल मध्ये पुरोहित संघाने घुसण्याचा प्रयत्न केला होता मात्र एकच शो असून तो कोर्ट आदेशानुसार थांबवता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आणि त्यांना बाहेर थांबवले आहे.