मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (13:01 IST)

सुवर्णपदकासाठी अजब अट : शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थी हवा

savitri bai fule collage

केवळ शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थ्यांनाच विद्यापीठामार्फत ‘योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ दिले जाईल असे पत्रकच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शेलारमामा सुवर्णपदकासाठीच्या अटींची यादीचे पत्रक प्रसिद्ध कऱण्यात आले असून, त्यात ही अजब अट घालण्यात आली आहे.

संकेतस्थळावरील पत्रकाप्रमाणे अटींमधील यादीतील सातव्या क्रमांकाची  अटीप्रमाणे अर्ज करणारा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा, अशी अट या पत्रकात आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणारा विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असावा, त्या विद्यार्थ्याने भारतीय आणि परदेशी क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवलेली असावीत. रक्तदान, श्रमदान, पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रण कार्य, साक्षरता आणि स्वच्छता मोहीम तसेच एड्स रोगाविरुद्ध जनजागरण मोहिमेमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग असावा, अशीही अट घालण्यात आली आहे. हे कमी म्हणून की काय योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या पुरस्कारासाठी प्राध्यान्याने विचार केला जाईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अटींची यादी खूपच मोठी आहे. वरील अटींशिवाय अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार, विचार, परंपरांचे जतन करणारा तर असावाच. पण त्याने गायन नृत्य, वक्तृत्व, नाट्य आणि इतर कलांमध्ये नैपुण्य मिळवलेले असावे, अशीही अट या पत्रकात आहे.