शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भूकंपाचे सौम्य धक्के : सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात

सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी होती.सुदैवाने भूकंपात जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
 
कोयना परिसरापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणेतील जवळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले.
 
याशिवाय साताऱ्यातील कराड भागासह कडेगाव तालुका, तसंच रत्नागिरीच्या देवरुख, संगमेश्वर आणि चिपळूणच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता कमी असली तर त्याचा कालावधी जास्त होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले.