शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सांगली , गुरूवार, 18 मे 2017 (12:41 IST)

सांगलीत सरपंचाची निर्घृण हत्या

कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे विद्यमान सरपंच युवराज पाटील यांची बुधवारी रात्री एकच्या सुमारास घराशेजारीच हत्या झाली.  
 
युवराज पाटील हे शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुका प्रमुख दिनकर पाटील यांचे बंधू आहेत. युवराज पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारीही होते.
 
अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी घरासमोरच असलेल्या युवराज पाटील यांच्या मान आणि डोक्यावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. 
 
युवराज पाटील यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.