Oppo Realme 2 स्मार्टफोन, फेस अनलॉक, इतका स्वस्त की जाणून व्हाल हैराण...
चीनी कंपनी Oppo आता भारतीय बाजारात आपले सब-ब्रँड Realme चे नवीन स्मार्टफोन Realme 2 लाँच करत आहे. या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशंस लीक झाल्याची बातमी आहे. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार यात 6.2 इंची नॉच्ड डिस्प्ले असेल. यासोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसरसह हा फोन लाँच करण्यात येईल.
या फोनची स्क्रीन फोनचा 88.8 टक्के भाग असेल. 6.2 इंची हायडेफिनेशन क्वॉलिटीवर मूव्ही आणि गेम्स स्पष्ट बघता येतील.
Oppo Realme 2 मध्ये फेस अनलॉक फीचरसह फिंगरप्रिंट सेंसर देखील असेल. जेव्हाकि Realme 1 यात केवळ फेस अनलॉक फीचर देण्यात आले होते.
कंपनी या स्मार्टफोनचे दोन वेरिएंट बाजारात प्रस्तुत करत आहे. पहिला वेरिएंट 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेजसह येईल जेव्हाकि दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेजसह मिळेल. या व्यतिरिक्त याचा स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डद्वारे 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.
आता आपण विचार करत असाल की इतके फीचर्स असलेला फोन महागडा असावा तर Realme 2 च्या दोन्ही वेरिएंट ची किंमत 10 हजार रुपयेच्या आत असावी असे सांगण्यात येत आहे. तरी कंपनीने अजून किंमत बद्दल माहिती दिलेली नाही.