1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'बिग बॉस' १२ वा सीजन १६ सप्टेंबर पासून

Bigg Boss
रिअॅलिटी शो बिग बॉस १२ वा सीजन १६ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. दरवेळी प्रमाणे यावेळी देखील बॉलीवूड स्टार सलमान खान शो होस्ट करणार आहे. बिग बॉस १२ पहिल्या सीजन पेक्षा बराच वेगळा असणार आहे. या शोमध्ये जोड्या बोलावले जातील. तसेच यामध्ये फक्त कपल जोड्या नसून मुलगा-आई, भाऊ-बहिण, सासू-सून, मामा- भाचा अशा जोड्या देखील पाहायला मिळणार आहेत.
 
यावेळी या शोमध्ये २१ कंटेस्टेंट असणार आहे. त्यामध्ये ३ सेलिब्रिटी कपल तसेच ३ कॉमन जोड्या असणार आहे. असे १२ कंटेस्टेंट असणार आहेत. या शोमध्ये सगळ्यात जास्त फी ब्रिटिश डॅनी डी आणि शो मधली त्यांची पार्टनर माहिका शर्मा यांची असणार आहे. या दोघांना प्रत्येक आठवड्याचे ९५ लाख रुपये इतकी फी देण्याचे ठरले आहे असे समजते.