1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

मराठी बिग बॉस शोमध्ये उषा नाडकर्णी स्पर्धक

usha nadkarni
बिग बॉस शो आता मराठीत येत आहे.  दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता असलेले महेश मांजरेकर या शोचे सुत्रसंचालन करणार आहेत. तर उषा नाडकर्णी असणार सहभागी होणार आहे. 
 
उषा नाडकर्णी या कार्यक्रमाचा भाग असल्याचे त्यांनी स्वतः एका  मुलाखतीत सांगितले आहे. त्या सांगतात, मी बिग बॉस मराठीत स्पर्धक म्हणून जाणार आहे. या कार्यक्रमात माझ्या वयाचे कोणतेही स्पर्धक नाहीयेत. खरे सांगू तर या कार्यक्रमात जायला मला थोडीशी भीती वाटत आहे. बिग बॉसमध्ये तुम्हाला तुमच्या फोनशिवाय राहायला लागते. त्यामुळे अनेकांना आपण फोनशिवाय राहू शकतो का याचे टेन्शन असते. पण मला फोनची तितकीशी सवय नसल्याने मला तसे टेन्शन नाही असे त्यांनी सांगितले.