testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'F.U.- Friendship Unlimited' चा टीझर लाँच

FU
मुंबई- फ्रेशन लूक, न संपणारी एनर्जी, रोमान्स, तरुणाई चा एटिड्यूड आणि फुल ऑफ लाइफने भरलेल्या या वर्षातील सर्वात धमाकेदार अशा F.U. या चित्रपटाचा भव्य टीझर लाँच सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आणि सोशल मीडिया वर काही तासांत 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झाले.
F.U. च्या या पहिल्याच लूक लूक वर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले आहेत. सैराटच्या भव्य यशानंतर करोडो लोकांच्या आणि विशेषतः तरुणींच्या मनात घर केलेल्या आकाश ठोसर F.U. या चित्रपटातून एका ट्रेंडी लुक मध्ये आपल्या समोर येत आहे. आकाश बरोबरच या टीझरमध्ये सत्या मांजरेकर, मयूरेश पेम, शुभम किरोडीयन, माधव देवचक्के, पवनदीप, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, स्वामिनी वाडकर, रिया बर्मन, राधा सागर, मधुरा देशपांडे, स्वरदा ठिगळे या तरुण कलाकारांबरोबरच सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, शरद पोंक्षे, स्व. अश्विनी एकबोटे, भारती आचरेकर आणि महेश मांजरेकर या अनुभवी कलाकारांची फौज दिसते त्याचबरोबर बोमन इराणी आणि इशा कोप्पीकर हे बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध कलाकार सुद्धा या चित्रपटात आहेत.
नटसम्राट, ध्यानीमनी या आशयघन चित्रपटानंतर महेश मांजरेकर, तमाम तरुणाई चे प्रतिनिधित्व करणाऱ्या पात्रांचा आणि आजच्या तरुणाई ची भाषा बोलणारा F.U
हा चित्रपट घेऊन येत आहेत.
बॉलीवूड मधील कलाकारांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतील तगडे व्यावसायिक या चित्रपटाच्या
प्रदर्शनासाठी एकत्र आले आहेत, T.Series चे भूषण कुमार आणि किशन कुमार हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत त्यांची हि प्रसिद्ध संस्था या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे, त्याचबरोबर बॉलीवूड मधील अनेक भव्य आणि मोठ्या बॅनर चे चित्रपट आणि बाहुबली या चित्रपटाचे वितरक अनिल थडानी F.U.चे वितरण करीत आहेत. भूषण कुमार आणि अनिल थडानी यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली.
हा टीझर लाँच सोहळा गाजला तो कलाकारांच्या विशेष सादरीकरणाने. F.U. या चित्रपटातून मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करणारे तरुण संगीतकार विशाल मिश्रा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल 'यूलिया' हिने बहारदार गाण्याचे सादरीकरण केले आणि त्यानंतर F.U. च्या धमाकेदार गाण्यावर आकाश ठोसर आणि सर्व तरुण कलाकारांनी नृत्याचा ठेका धरून सोहळ्याचा कळस गाठला.

विशाल मिश्रा आणि समीर साप्तीस्कर यांनी अतिशय युथफूल आणि ठेका धरायला लावणारे संगीत दिले आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिजित देशपांडे यांच्या साथीने या चित्रपटाचे लेखन सुद्धा केले आहे. F.U. ची निर्मिती अभय गाडगीळ, महेश पटेल, दिनेश किरोडीयन आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे. आजच्या तरुणाई ची भाषा बोलणारा F.U. - Friendship Unlimited हा भव्य चित्रपट येत्या २ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

बायकोने जेवत असलेल्या नवर्‍यावर लाटणं का फेकलं

बायकोने जेवत असलेल्या नवर्‍यावर लाटणं का फेकलं
नवरा - तुला किती वेळा सांगितले... स्वयंपाक करताना मोबाईल मध्ये तोंड खुपसून स्वयंपाक नको ...

व्हाईट आऊटफिटमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमर्स अंदाज, सोशल ...

व्हाईट आऊटफिटमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमर्स अंदाज, सोशल मीडियावर झाली ट्रोल
बॉलीवूडची सुंदर नायिका दीपिका पादुकोण नुकतीच एका इवेंटमध्ये सामील होण्यासाठी नवी दिल्ली ...

पीएम मोदी यांच्यावर हे खास चित्रपट बनवत आहे भंसाळी, प्रभास ...

पीएम मोदी यांच्यावर हे खास चित्रपट बनवत आहे भंसाळी, प्रभास आणि अक्षयने प्रसिद्ध केले पोस्टर
सलमान खान आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट इंशाअल्लाहबद्दल झालेल्या वादामुळे मशहूर निर्माता ...

विद्या बालन 'शकुंतला देवी'च्या भूमिकेत, टीझर प्रदर्शित

विद्या बालन 'शकुंतला देवी'च्या भूमिकेत, टीझर प्रदर्शित
अभिनेत्री विद्या बालन आगामी 'शकुंतला देवी' हा चित्रपट लवकरच घेवून येत आहे. या चित्रपटात ...

एमएक्स प्लेयर घेऊन येत आहे 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' ...

एमएक्स प्लेयर घेऊन येत आहे 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' #WeekendBingeOnMX
बाप्पाचा आशीर्वाद, चविष्ट मोदकांचा आस्वाद घेऊन आपण सगळ्यांनीच उत्साहात गणेशोत्सव साजरा ...