- मनोरंजन
- हास्यकट्टा
- व्हॉट्सअप मॅसेजेस
" गुरु "
गुरु म्हणजे श्रद्धा
गुरु म्हणजे आदर
जणू काही गुरु म्हणजे
आईचाच पदर ll
गुरु म्हणजे संकटकाळी
बाहेर पडण्याचा मार्ग
ज्ञान आणि अनुभवाचा
सद्विचारी स्वर्ग ll
पीडा आणि वेदनेसाठी
शब्दांचा मलम
गुरु म्हणजे अध्यात्माचं
रेशीम वस्त्र तलम ll
गुरु म्हणजे चंदनाची
थंडगार उटी
आईने लेकराला
उगाळून दिलेली घूटी ll
गुरु म्हणजे उपाय
गुरु म्हणजे काढा
निस्वार्थ मार्गदर्शनातून
निर्माण झालेला ओढा ll
शिष्याच्या कल्याणा
मोलाची साथ
गुरु म्हणजे न दिसणारा
भगवंताचा हात ll