गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सलमानने फक्त 45 मिनिटात रेकॉर्ड केले मराठी गीत

अॅक्टिंग आणि पेटिंगव्यतिरिक्त सलमानला गाण्याचाही छंद आहे हे तो आधीच सिद्ध करून चुकला आहे. पण त्याने आपले पहिले मराठी गीत केवळ 45 मिनिटात रेकॉर्ड केले हे तर कौतुकास्पदच आहे.
बॉलीवूडचा हा सुपरस्टार महेश मांजरेकरचे चित्रपट फ्रेंड्स अनलिमिटेड यासाठी काही विशेष सेवा देतोय. यात त्याचं मराठी गाणं ऐकायला मिळणार आहे. पण नवल म्हणजे सलमानने हे गाणं केवळ 45 मिनिटांत रेकॉर्ड करून सर्वांना चकित केले.
 
गायक विशाल मिश्रा यांनी सांगितले की हे गाणं सलमानने इतक्यांदा ऐकले याचं संगीत आणि बोल त्याने घोकून घेतले. म्हणून रेकॉडिंग पटकन झाली.