Pawna Lake लोणावळ्याजवळील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ
Maharashtra Tourism : पवना तलाव हे एक कृत्रिम सरोवर आहे, जे पवना धरणाच्या बॅकवॉटरमुळे तयार झाले आहे. हा तलाव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्या मध्ये असून, लोणावळ्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच पवना धरणाचे बांधकाम १९६३ मध्ये सुरू झाले, ज्यामुळे या तलावाची निर्मिती झाली. .
पवना तलाव हे मुंबई आणि पुणे येथील लोकांसाठी वीकेंडला भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तलावाच्या काठी अनेक कॅम्पिंग साइट्स उपलब्ध आहे, जिथे लोक रात्री मुक्काम करून शांत आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेतात. तसेच तलावाभोवती हिरवेगार डोंगर, घनदाट जंगल आणि शांत वातावरण आहे, ज्यामुळे ते निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरते.
या ठिकाणी बोटिंग आणि कयाकिंग सारख्या जल क्रीडांचा आनंद घेता येतो. जून ते सप्टेंबर दरम्यान ओसंडून वाहणारे धबधबे आणि हिरवीगार निसर्गरम्यता अनुभवण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तसेच डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कॅम्पिंग आणि शांत वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी हवामान खूप आल्हाददायक असते. पवना तलाव हे निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि मनोरंजक वेळ घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही ऑक्टोबर ते मार्च, जून-सेप्टेंबर असून या दिवसांमध्ये हिरवीगार निसर्ग सुंदर दिसतो. पवना तलाव हा निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. पवना तलाव हा निसर्ग, साहस आणि विश्रांतीसाठी परिपूर्ण ठिकाण आहे.
पवना तलाव लोणावळा जावे कसे?
पवना नदीवर बांधलेल्या धरणामुळे तयार झालेला हा तलाव लोणावळ्याच्या बाहेरील भागात आहे. जवळील किल्ले जसे लोहगड, विशापूर, टिकोणा आणि तुंग यांच्याभोवती वसलेला आहे. मुंबईतून सुमारे १०५ किमी, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून लोणावळा गाठून पुढे १५ किमी प्रवास करावा लागतो. तसेच पुण्यातून ५२ किमी अंतर असून पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरून जात येते. तसेच लोणावळा किंवा कामशेत रेल्वे स्टेशन उतरून खाजगी जीप किंवा टॅक्सीने २०-३० मिनिटांत पोहोचता येते.