गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मे 2018 (10:50 IST)

बिग बॉसच्या घरात होणार अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत

'बिग बॉस मराठी' या शोमध्ये आता अजून एक स्पर्धक सहभागी होणार असून त्यामुळे खुप मोठा बदल दिसणार आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही या घरात पोहोचणार आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे अभिनेत्री हर्षदा खानविलकरने बिगबॉसच्या घरात प्रवेश केला होता. बिग बॉस मराठी हा शो सुरू होऊन आता जवळपास ३० दिवस पूर्ण झाले आहेत. तर या घरात दोन गट आधीच तयार झाले आहेत. त्यामुळे स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.  घरात झालेले 2 गट, मेघा आणि रेशम मधील शाब्दिक युद्ध, रेशम आणि राजेशमध्ये फुललले प्रेमप्रकरण यामुळे पाहणारे आनंद घेत आहेत. बिग बॉसचा मराठीमधला पहिलाच सिझन आहे आणि अंतरंग स्पर्धकांमुळे त्याला प्रतिसादही उत्तम आहे. या आगोदर स्पर्धेतून राजेश शृंगारपुरे याला बाहेर जावे लागले .आहे. त्यामुळे येत्या काळात कोण बाहेर येतो, काय होते आणि  त्या बंद   घरात नेमेक कोणते राजकारण होते हे पाहणे    उत्सुकतेचे होणार आहे.