गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 मे 2018 (15:04 IST)

विधार्भात पाणी प्रश्न पेटला जीवण प्राधिकरणच्या एका अभियंत्याला मारहाण

पाण्यासाठी नागरिकांचा उद्रेक झालाय. वडगाव चौकात पाणीटंचाईच्या प्रश्नातून जीवण प्राधिकरणच्या एका अभियंत्याला मारहाण करण्यात आलीय. वडगाव चौकात पाणीटंचाईमुळे हैराण ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत यवतमाळ आर्णी मार्ग बंद पाडला आहे. आधी पाणी द्या   मग चर्चा करू असे नागरिक बोलत आहेत. तर पाणीप्रश्नासाठी  नागपूर तुळजापूर मार्गावरही नागरिकांना रास्तारोको केला. रस्त्यावर टायर पेटवण्यात आले. मानवी साखळी करुन  भोसा परिसरात घाटंजी आर्णी मार्ग रोखून धरण्यात आला आहे. या परिसरात पाणी प्रश्न फार गंभीर झाला आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत. त्यांचा संताप नावर होत असून, जर पाणी प्रश्न सोडवला गेला नाही तर मोठे आंदोलन येथे होवू शकते अशी स्थिती आहे. मान्सून येवून येथे पोहचायला अनेक दिवस  आहेत. उन्हाची तीव्रता आणि  येथील प्रदेशात पाणीच नाही त्यामुळे नागरिक संतापले आहेत.