मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

२८ सप्टेंबरला 'मुंबई पुणे मुंबई ३' प्रेक्षकांच्या भेटीला

‘मुंबई पुणे मुंबई-१’ चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई’च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही हिट जोडी या तिसऱ्या भागातही दिसणार आहे. २८ सप्टेंबर २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘मुंबई पुणे मुंबई’ या आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यातून त्याच्या दुसऱ्या भागाची निर्मिती झाली. त्याशिवाय पहिल्या भागाची अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली. प्रेक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती केली गेली होती. स्वप्नील आणि मुक्ता ही जोडी रसिकांना खूपच भावली होती. दोन्ही चित्रपटांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता. ही बाब बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केलेल्या व्यवसायातूनही स्पष्ट झाली होती. ‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत.