बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

बकेट लिस्ट च ‘तू परी’ सोशल मीडियावर प्रदर्शित

बकेट लिस्ट’ या चित्रपटातील “होऊन जाऊ द्या!” या गाण्याच्या तुफानी हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचं अवचित्य साधून चित्रपटातील रोमँटिक असं ‘तू परी’ हे दुसरं गाणं सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित झालं.  या गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने खुलताना आपणांस बघायला मिळणार आहेत. या गाण्याचं संपूर्ण शूटिंग मलेशिया येथील लंकावी येथे करण्यात आलेले आहे. ‘तू परी’ गण्यादारम्यान आपणांस लांकवी येथील अप्रतिम लोकेशन्स व त्याच बरोबर सौंदर्यवती माधुरीच्या मोहक अदा, सुमित राघवनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.लंकावी सारखे नयनरम्य लोकेशन, माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन ह्या अत्यंत गोड अशा जोडीचे नृत्य आणि श्रेया घोषाल आणि रोहन प्रधान यांच्या मधुर स्वरांनी सजलेलंआहे .