गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मे 2018 (08:35 IST)

नशीब त्या चष्माधारी बोकडच, नाही तर ......

'वाघेऱ्या' सिनेमाच्या पोस्टरवरील चष्माधारी बोकड सध्या ट्रेण्डिंग आहे.  मात्र हे बोकड मरता मरता वाचलं.  या सिनेमात बोकडाची भूमिका आहे. त्यासाठी ते बोकड सेटवर आणले होते. मात्र हे बोकड, संध्याकाळच्या जेवणासाठी आणल्याचा समज आचाऱ्यांचा झाला. त्यामुळे त्यांनी ते चष्मेबहाद्दर बोकड थेट स्वयंपाक घरात घेऊन गेले.

तिकडे सेटवर शूटिंगची सर्व तयारी झाल्यानंतर बोकड अचानक गायब झाल्याचे दिसलं. त्यामुळे त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. त्यादरम्यान, सिनेमातल्या वाघाला डांबण्यासाठी आणलेलं हे बोकड स्वयंपाकघरात नेल्याची माहिती सेटवरील एका माणसाला कळली, आणि एकच धांदल उडाली. मग सगळ्यांनी धावतपळत जात बोकडाला तिथून बाहेर काढलं आणि या बोकडाचा रस्सा होता होता वाचला.