रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 मे 2018 (15:08 IST)

सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही आजपासून संपावर

मुंबई येथील जे जे रुग्णालयात डॉक्टरला बेदम मारहाण प्रकरणी आता सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही  आजपासून संपावर गेले आहे. या आगोदर जेजे रुग्णालयातील डॉक्टर संपावर गेले होते. सायन रूग्णालयातील सुमारे ४५० निवासी डॉक्टरांचे आज कामबंद आंदोलन सुरु केले आहे. गिरीश महाजन आणि संपकरी डॉक्टरांची बैठक संपली, बैठकीत सकारात्मक तोडगा, मात्र संप मागे नाही, मागण्यांच्या अंमलबजावणीनंतरच संप मागे घेणार अशी भूमिका घेतली असून संप सुरूच आहे. केईएम आणि नायर रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाण्याची शक्यता आहे  मागण्या मान्य होत नसल्यानं मार्डने इथ संपाचे हत्यार उपसलं आहे. गिरीश महाजन यांच्यासोबत फिस्कटलेल्या चर्चेनंतर निवासी डॉक्टर ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपल्या काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. सुमारे चारशेहून अधिक निवासी डॉक्टर संपावर असल्याने जे.जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा रुग्णालय आणि जी.टी. रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. जेजे रुग्णालयातील एका डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली होती, त्यामुळे आणि सतत होत असलेल्यां हल्ल्यामुळे डॉक्टर वैतागले आहेत. त्यांनी सुरक्षा मागितली असून अनेक मागण्या केलेल्या आहेत. नुसते आश्वासन नको तर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.