रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

Gudi Padwa 2022 गुढीपाडव्याच्या दिवशी देवी लक्ष्मीला आमंत्रित करा, 11 कवड्या करतील मालामाल

Gudi Padwa 2022 कवड्या पांढर्‍या, तपकिरी, पिवळ्या आणि चितकबरी रंगाच्या असतात. यांना देवी लक्ष्मीचे रुप मानले गेले आहे. या समुद्राहून प्राप्त होतात. तर चला जाणून घ्या की गुढीपाडव्याला या कवड्या वापरुन कशा प्रकारे धनवान होता येऊ शकतं...
 
1 देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीपाडवा पूजन करताना 11 कवड्यांची देखील पूजा करावी. या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवाव्या. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात भरभराटी येते.
 
2 आपल्या घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून गुढी पाडव्याला आपल्या घराच्या मुख्य दारावर 11 कवड्या लाल कपड्यात बांधून लटकून द्याव्या. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
 
3 वाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी गुढीपाडव्याला एक पिवळ्या रंगाची कवडी आपल्या गळ्यात ताबीज म्हणून घालावी. असे केल्याने वाईट दृष्ट लागत नाही.
 
4 गुढीपाडव्याच्या दिवशी 11 पिवळ्या कवड्या हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधून लपवून ठेवल्याने कुबेर देवता प्रसन्न होतात.